Linked Node

Content

उपचार परिणाम (Treatment Outcome)

जेव्हा क्षयरोगाचा रुग्ण निर्धारित औषधोपचार पद्धतीनुसार योग्य प्रमाणात औषधांचे अंतर्गत सर्व डोस घेतो, तेव्हा रुग्णासाठी उपचार परिणाम घोषित केला जातो.

उपचार परिणाम Treatment outcome 

वर्णन (म्हणजे काय)

बरा झाला  (Cured)

एक क्षयरोग रुग्ण ज्याला उपचाराच्या सुरुवातीला सूक्ष्मजीवशास्त्रीयदृष्ट्या टीबीची पुष्टी झाली होती परंतु पूर्ण उपचारानंतर तो स्मीअर किंवा कल्चर नकारात्मक आहे I

उपचार पूर्ण (Treatment completed )

एक टीबी रुग्ण (बेडका अदुषित) ज्याने नेमून दिलेला औषधोपचाराचा कालावधी पूर्ण केला  परंतु उपचाराच्या शेवटच्या महिन्यात  बेडका / इतर जैविक नमुन्याचे स्मीअर किंवा कल्चर परिणाम नकारात्मक होते हे दाखवण्यासाठी कोणतेही रेकॉर्ड नसलेले, एकतर चाचणी न केल्यामुळे किंवा निष्कर्ष  उपलब्ध नसल्यामुळे

उपचार अयशस्वी (Treatment failure) 

एक टीबी रुग्ण ज्याचा  बेडका / जैविक नमुना उपचाराच्या शेवटी सूक्ष्मदर्शक तपासणी व्दारे किंवा कल्चरद्वारे सकारात्मक असतो.

लहान मुलांच्या टीबीचे प्रकरण जे सूक्ष्मजीवशास्त्रीय रूपांतर नकारात्मक स्थितीत करण्यात अयशस्वी झाले किंवा वैद्यकीयदृष्ट्या प्रतिसाद देण्यात अयशस्वी झाले/किंवा 4 आठवड्यांच्या अनुपालनाच्या अतिदक्षता कालावधी नंतर बिघडले तर त्यांना अयशस्वी प्रतिसाद मानले जाईल, जर वैकल्पिक निदान / प्रतिसाद न देण्याची कारणे नाकारली गेली असतील.

औषधोपचार अर्धवट सोडलेला (Loss to Follow Up)

एक टीबी रुग्ण ज्याच्या उपचारात एक महिना किंवा त्याहून अधिक काळ सतत व्यत्यय आला होता.

मूल्यमापन केले नाही (Not evaluated) 

एक टीबी रुग्ण ज्यासाठी कोणताही उपचार परिणाम नियुक्त केलेला नाही.

औषधोपचार प्रणाली बदलणे (Treatment Regimen changed)

एक टीबी रुग्ण जो प्रथम श्रेणी औषध उपचार पद्धतीवर आहे आणि त्याला टीबी (डीआर-टीबी) असल्याचे निदान झाले आहे आणि अयशस्वी घोषित होण्यापूर्वी डीआर-टीबी औषध उपचार पद्धतीवर सुरु करण्यात आले आहे. 

मरण पावला (Death)

टीबी-विरोधी उपचारादरम्यान मरण पावलेला रुग्ण (कोणत्याही कारणामुळे)

क्षयरोगाचा रुग्ण बरा झालेला किंवा पूर्ण उपचार झालेला, हा उपचाराच्या यशामध्ये गणला जातो ,तेव्हा उपचार यशस्वी मानले जाते.

Content Creator

Reviewer

Comments

drharshshah Tue, 21/03/2023 - 16:55

The TB Preventive Treatment Completion outcome parameters needs to be added somewhere. We may have to create entire new pages for PMTPT or to include where it fits, I guess. I have not added PMTPT outcome parameters here. It will confuse the reader.